Beed Crime : बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती

| Updated on: Mar 16, 2025 | 1:03 PM

Beed Crime News Updates : बीडच्या आष्टी तालुक्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झालेली बघायला मिळाली आहे. एका तरुणाला 2 दिवस बांधून ठेवत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

बीडमध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप होतं आहे. मारहाणीत विलास बनसोड या तरुणाचा मृत्यू झाल्याचा या तरुणाच्या कुटुंबियांचा आरोप आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत तरुण हा बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता. गेल्या 2 दिवसांपासून त्याला बांधून ठेवण्यात आलेलं होतं. त्याला मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर या तरुणाला एका रुग्णालयात टाकून त्याच्या घरच्यांना त्याला घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. तर या घटनेचे फोटो समोर आले असून या फोटोवरून ही संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 16, 2025 01:02 PM
FasTag Video : तुमच्या कारला फास्टटॅग आहे का? असेल तर हा व्हिडीओ बघाच, कारण 1 एप्रिलपासून…
Sanjay Raut Video : नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राऊतांकडून मंत्री उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, ‘त्यांचं अभिनंदन, कारण..’