Beed Corona | बीडमध्ये 8 दिवसानंतर आज वाईन शॉप सुरु, मद्यपींच्या रांगा
माजलगाव येथे मद्य प्रेमींनी दारूच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
बीड: आठ दिवसानंतर बीडमध्ये सकाळी वाइन शॉप सुरू करण्यात आले होते. त्यामुळे माजलगाव येथे मद्य प्रेमींनी दारूच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. लॉकडाऊनमध्ये मद्याची दुकाने बंद होती मात्र आज दुकान सुरू झाल्याने मद्य प्रेमींनी मोठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.