Beed Morcha : सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी माणसे जमली…

| Updated on: Dec 28, 2024 | 2:10 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी विरोधी पक्षांनी मुक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत हा मोर्चा निघाला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येचनंतर राज्यासह देशात बीडचे नाव कुप्रसिद्ध झाले. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचे हत्याकांड झाले त्यापद्धतीने गावकऱ्यांवर इतकी दहशत पसरली की कोणी बोलायला तयार नव्हते. अशात विरोधी पक्षांनी या हत्याकांडातील सूत्रधारांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात प्रशासनावर दबाव येण्यासाठी विरोधी पक्षांनी मूक मोर्चा पुकारला आहे.या मोर्चाची सुरुवात बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजपाचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाची सुरुवात केली आहे.

Published on: Dec 28, 2024 01:36 PM
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही हे दाखवा, बच्चू कडू यांची मागणी