राजकारण प्रचंड निर्दयी असतं; पंकजा मुंडे यांनी भर कार्यक्रमात मनातील खंत बोलून दाखवली

| Updated on: Apr 10, 2023 | 11:23 AM

Pankaja Munde on Maharahstra Politics : बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी राजकीय जीवनातील खंत बोलून दाखवली आहे. त्या काय म्हणाल्या आहेत? पाहा व्हीडिओ...

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना स्वत: च्या भावना बाजूला ठेवून वागावं लागतं, असं सांगितलं आहे. बीडमध्ये आयोजित बालाजी डेकोरेशन ॲन्ड इव्हेंटस या फर्मच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली मनातील भावना बोलून दाखवल्या. आपल्याला कितीही दुख: असलं तरी लोकांमध्ये गेल्यानंतर हसावं लागतं. आपण आजारी असलं तरी आपण शब्द दिला असेल तर तिथं जावं लागतं. घरात कुणी आजारी असेल तरी जावं लागतं. आपल्याला हसू येत असलं तरी लोक दुख:त असतील तर आपल्यालाही दु:खी व्हावं लागतं, असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत.

Published on: Apr 10, 2023 11:20 AM
पुढे पायलट मागे स्कॉड कशासाठी? लोक मारतील म्हणून; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान