पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

| Updated on: Apr 13, 2023 | 12:44 PM

Parli Vaijnath Sakhar Karkhana GST Department Raid : पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

परळी, बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. जीएसटी विभागाने हा छापा टाकला आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर आज सकाळपासून कारवाई होत आहे. जीएसटी थकवल्या प्रकरणी जीएसटीचे अधिकारी हे सकाळी दहा वाजल्यापासून वैधनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चौकशी करत आहेत.नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होतेय? याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र जीएसटीचे अधिकारी सकाळपासून वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात चौकशी करत आहेत.

Published on: Apr 13, 2023 12:44 PM
Hasan Mushrif : ईडी प्रकरणात हसन मुश्रीफ यांना दिलासा; 27 एप्रिलपर्यंत संरक्षण कायम
रोजगार मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला नारायण राणेंच प्रत्युत्तर; म्हणाले, आता…