Khokya Bhosale : कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल; खोक्याची खतिरदारी करणं पोलिसांना भोवलं
Satish Bhosale Viral Video : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला पोलिसांकडून मिळत असलेल्या शाही ट्रीटमेंटचा व्हिडिओ व्हारायल होताच या पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
खोक्या भोसलेला कारागृहात VIP ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीसांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही कारवाई केली आहे.
एकीकडे आमदार सुरेश धस हा त्यांचा कार्यकर्ता दाखवण्यात आला तेवढा तो मोठा नाही असं म्हंटलं होतं. तर दुसरीकडे आता याच खोक्या भाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात खोक्याला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं दिसत आहे. कारागृहाच्या बाहेर बसून आरामात जेवण करत आहे. तसंच त्याच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे, असा हा व्हिडिओ आहे. सोशल मिडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी खोक्या भाईला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन्ही पोलिसांना नियलंबीत केलं आहे. तसंच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
Published on: Mar 25, 2025 12:02 PM