संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं, त्याचा काय गुन्हा होता ? बजरंग सोनावणे संतापले
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्य आरोपी फरार आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस तपासाबाबात तीव्र नाराजी व्यक्त केली
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्य आरोपी फरार आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस तपासाबाबात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी अनेक आरोपही त्यांनी केले. 6 डिसेंबर रोजी काय झाले याची सोनावणे यांनी माहिती दिली. खंडणीसाठी आलेल्या आरोपींनी सरपंचाला मारहाण झाली. त्यानंतर गार्ड आणि सरपंच देशमुखाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पण त्यांची फिर्याद घेतली नाही. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही ? असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला.
संतोष देशमुख किडनॅप केलं, त्यांना टॉर्चर करून मारलं. त्यांच्या शरीरावर 56 व्रण असल्याचं पोस्टमार्टममध्ये आलं आहे. त्याचा असा काय गुन्हा होता? असा सवालही सोनावणे यांनी विचारला. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून आता खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनीही पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली.