Pandharpur | रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायावर वज्रलेप लावण्यास सुरुवात
पंढरपूर, आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपूरला भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. विधुरायासह माता रुक्मिणीचेही भाविक मनोभावे दर्शन घेतात. भाविक मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होतात. गेल्या काही वर्षांपासून मूर्तीच्या पायाची झीज होत असल्याने पायाला वज्रलेप लावण्यात येत आहे. वज्रलेप लावण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. अतिशय कमी वेळ शिल्लक […]
पंढरपूर, आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपूरला भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. विधुरायासह माता रुक्मिणीचेही भाविक मनोभावे दर्शन घेतात. भाविक मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होतात. गेल्या काही वर्षांपासून मूर्तीच्या पायाची झीज होत असल्याने पायाला वज्रलेप लावण्यात येत आहे. वज्रलेप लावण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. अतिशय कमी वेळ शिल्लक राहिल्याने मंदिर व्यवस्थापनाची धावपळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वारकरी मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेत असल्याने पायाची झीज होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधीही वज्रलेपाची प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र अपुऱ्या वेळामुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. आता पुन्हा या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.