‘अंधेरी नाक्यावरचे भिकारी…’, ‘प्रेतावरचं टाळू खाण्याचा…’, ठाकरे गटाच्या खासदाराची शिंदे गटावर टीका

| Updated on: Oct 25, 2023 | 10:56 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत असताना मागचे दिवस वाया का घालवले. जरांगे यांना आजपासून उपोषणाला का बसवत आहेत? आत्महत्या करायला प्रोत्साहित करत आहेत का? आरक्षण देण्याचा फॉर्म्युला असेल तर जाहीर करा. प्रेतावरचं टाळू खाण्याचा यांचा पक्ष आहे का? असा सवाल ठाकरे गटाच्या खासदारांनी केला.

मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : शिवतीर्थवरचा दसरा मेळावा 1001% यशस्वी झाला. लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आले होते. गाडीची सोय न करता, बिर्यानी खाऊ न घालता, पैसे न वाटता गर्दी जमली होती. उद्धव ठाकरे भाषण करत होते तेव्हा कोपरा आणि कोपरा भरला होता. स्वतःच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच वाकून बघायचं ही आमची सवय नाही. विरोधकांचा हा पोरकटपणा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. आझाद मैदानावर गद्दारांचे नेते बोलत होते तेव्हा खुर्च्या रिकाम्या होत्या. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भाषणाकडे त्यांनी पाठ फिरवली. त्या ठिकाणी राम लीला सुरु होती तिथली लोकं आणली होती. अंधेरी नाक्यावरचे भिकारी यांनादेखील गाडीत बसवलं गेलं असा आरोपही त्यांनी केला.

Published on: Oct 25, 2023 10:56 PM
मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण अन् मुख्यमंत्री दिल्लीत, आरक्षणासंदर्भात काय घडताय घडामोडी?
मराठ्यांना सरसकट कुणबीचे दाखले द्या, मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीनंतर आता नवी मागणी काय?