पनवेल ते बेलापूर दरम्यान मुंबई लोकची वाहतूक ठप्प, अतिवृष्टीचा चाकरमान्यांना फटका

| Updated on: Jul 19, 2023 | 1:38 PM

त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा चाकरमांन्यां बसत आहे. ठाणे, नवी मुंबईत झालेल्या पावसामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर परिसरात पावसाचाजोर वाढला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा चाकरमांन्यां बसत आहे. ठाणे, नवी मुंबईत झालेल्या पावसामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे. असेच बदलापूर आणि अंबरनाथ, पनवेल ते बेलापूर दरम्यान रेल्वे रूळावर पाणी आल्याने हार्बर मार्गावर मुंबई लोकची सेवा विस्कळीत झाली. ज्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. तर लोकची वाहतूक ठप्प झाल्याने अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली दिसून आली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने सुटत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.

Published on: Jul 19, 2023 01:38 PM
आदित्य ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार भाजपच्या वाटेवर? नेमकं प्रकरण काय?
“त्यांना केक खाऊ घाला”, प्रश्न विचारण्यावरून फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी