पिंपरी चिंचवडमध्ये नामांतर बॅनर्सला उत; आता कोणत्या नावाची मागणी?

| Updated on: Jun 05, 2023 | 1:20 PM

त्याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. तर भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीय. शहराच्या विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड : राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यावरून मोठा राजकीय वाद सध्या राज्यात होताना दिसत आहे. त्याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. तर भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीय. शहराच्या विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ही मागणी केलीये. शहरात जवळपास 100 हून अधिक ठिकाणी पिंपरी चिंचवड चा जिजाऊ नगर हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात चर्चेला उधाण आलय.

Published on: Jun 05, 2023 01:20 PM
नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार? बच्चू कडू यांच्यानंतर राष्ट्रवादीचा अमरावती मतदारसंघावर दावा!
बावनकुळेंना टीका करण्याचा अधिकार ते भाजप नेत्यांचे संस्कार, अजित पवार का संतापले ?