‘औरंगजेबाविषयी चुकीचं सांगितलं जातंय, औरंगजेबानं सतीप्रथा बंद केली?’; नेमाडे यांचे मोठं वक्तव्य
पावशाळी अधिवेशनात देखील यावरून आमदार अबू आझमी, आमदार निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
मुंबई, 06 ऑगस्ट 2013 | राज्यात सुरू असणारी औरंगजेबचा वाद काही केल्या कमी झालेला नाही. पावशाळी अधिवेशनात देखील यावरून आमदार अबू आझमी, आमदार निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या सांगता समारंभात यावरून ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच औरंगजेबने ज्ञानवापीची मोडतोड का केली हे देखील त्यांनी सांगितलं. पंड्यांनी राण्यांना भ्रष्ट केल्यानेच काशीविश्वेश्वर जी आजची ज्ञानव्यापी आहे त्याची तोडफोड केली. तर औरंगजेब याने सर्वात आधी सतीप्रथा बंद केल्याचेही नेमाडे यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 06, 2023 10:58 AM