शंकरपटात दरम्यान अपघात; काळाजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ… मालक अन् बैलजोडी…
बैलगाडा शर्यतीत सैराट बैलजोडीचा थरार, काळाजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ, मालक थोडक्यात वाचला... पाहा व्हायरल व्हीडीओ...
भंडारा : बातमी भंडाऱ्यातून… भंडाऱ्यातील साकोली इथं भरलेल्या शंकरपटातील एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. शंकरपटात बैलजोडी सैराट झाल्याचं पाहायला मिळालं. अन् ही बैलजोडी थेट खांबाला जाऊन धडकली. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत बैलांना आणि बैलजोडी हाकणाऱ्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झालेली नाही. ते सुखरूप असल्याची माहिती आहे. आता या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. शंकटपटावरील बंदी हटल्यापासून शंकरपटाचा थरार पुन्हा अनुभवायला मिळू लागली आहे. मात्र या घटनेची सर्वत्र चर्चा होतेय.
Published on: Mar 01, 2023 09:57 AM