भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; टायर फुटला अन् जागीच पलटी!

| Updated on: Mar 05, 2023 | 9:34 AM

Bhandara Accident News : भंडाऱ्यामधील लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील गडेगाव उड्डानपुलावर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झाला आहे. भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरो पिकअपचा टायर फुटला अन् ही गाडी पलटी झाली. पाहा...

भंडारा : भंडाऱ्यामध्ये भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झालाय. भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरो पिकअपचा टायर फुटला अन् काही सेकंदात गाडी पलटी झाली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील गडेगाव उड्डानपुलावर घडली आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी इथे भरती करण्यात आलं आहे. तर महामार्गच्या मधोमध अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाला रस्त्यावरून बाजूला करण्यात आलं. वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Published on: Mar 05, 2023 09:34 AM
सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं; शिवसेनेच्या नेत्याचा आरोप
मुंबईकरांनो, लोकलचं वेळापत्रक पाहा अन् मगच घराबाहेर पडा; ‘या’ मार्गांवर आज मेगाब्लॉक