Video | गुलाबराव पाटलांनी फायद्यासाठी आजोबा बदलवले, विरोधी पक्षनेत्याचा घणाघात
आता बंडखोरी केली. आता तुमचा आजा बदलला.. ते आता एकनाथ शिंदे झाले आहेत, काही हरकत नाही...असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय.
भंडाराः गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या फायद्यासाठी आजा (आजोबा) बदलला, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अंबादास दानवे पोहोचले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील यांनी आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर तीव्र टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार आहेत, तर आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. अंबादास दानवे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, प्रबोधनकारांनी सर्वसामान्यांची सेवा हेच हिंदुत्व आहे, असं सांगितलं आहे. गुलाबराव पाटलांचे मागचे भाषण तुम्ही ऐका… आजा शिवसेना के पास आजा, बाळासाहेब ठाकरे के पास आजा… असं हेच बोलत होते. आता बंडखोरी केली. आता तुमचा आजा बदलला.. ते आता एकनाथ शिंदे झाले आहेत, काही हरकत नाही…असं वक्तव्य दानवेंनी केलंय.