Video : वाघ दिसला की गावात एकच गोंधळ; आरडाओरडा अन् धावपळ…

| Updated on: Feb 18, 2023 | 10:15 AM

भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील टांगा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाहा व्हीडिओ...

भंडारा : भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील टांगा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. मागच्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचं दर्शन होतंय. टांगा इथे अगदी समोरासमोर वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाघ दिसताच गावकऱ्यांनी आरडाओरड करत आहेत. वनविभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. पण वन विभागाने कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर याबाबत ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Published on: Feb 18, 2023 10:15 AM
आज महाशिवरात्री, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातील दृष्य पाहा…
उद्धव ठाकरे तुम्ही स्वत:चा पक्ष काढा; शिंदेगटातील मंत्र्याचा सल्ला