‘सरकार पडत नसल्यानं राऊत कासावीस’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका
'सरकार पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही म्हणून संजय राऊत कासावीस झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी पाण्यात ठेवलेले देव वरती येत नाहीत. पायपुसणी की हातपुसणी हे वेळ आल्यावर त्यांना नक्की कळेल'
मुंबई : ‘सरकार पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही, म्हणून संजय राऊत कासावीस झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी पाण्यात ठेवलेले देव वरती येत नाहीत. पायपुसणी की हातपुसणी हे वेळ आल्यावर त्यांना नक्की कळेल’, अशी टीका आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार गोगावले यांनी घेतला आहे. ‘राऊत यांना वाटलेलं हे सरकार पडेल, आम्ही अपात्र होऊ, पण तसं होत नसल्याने ते कासवीस झाले, कारण त्यांच्याकडे उरलेले मंत्री सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत.यामुळे कासावीस होऊन त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य आलं असेल, पण ठीक आहे आम्ही शिवसैनिक त्यांना उत्तर देऊ.’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम खूप मोठं आहे. लोकांना वेळ देत आहेत ही कामाची पोच पावती आहे.या आधीचे मुख्यमंत्री असा वेळ देत नव्हते. त्यामुळे अनेक नेते आमच्या संपर्कत आहेत. कोर्टाची सुनावणी झाल्यावर अनेक पक्षातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे. तसेच ‘राहुल नार्वेकर हे स्वतः वकील आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील कोणाच्याही दबावाखाली ते राहणार नाहीत, असं भरत गोगावले यांनी सांगितलं’.