“शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक…”, आदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांचं वादग्रस्त विधान
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय. भरत गोगावले यांच्यासह आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच पालकमंत्रिपदावर दावा करताना भरत गोगावले यांची आदिती तटकरे यांचा उल्लेख करत जीभ घसरली आहे.
मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय. अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात आदिती तटकरेही होत्या. त्यामुळे आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच पालकमंत्रिपदावर दावा करताना भरत गोगावले यांची आदिती तटकरे यांचा उल्लेख करत जीभ घसरली आहे. “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?,” असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे.भरत गोगावले यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे
Published on: Jul 12, 2023 03:13 PM