भरत गोगावले यांना भरभरून निधी; अजित पवार यांच्याकडून खूश करण्याचा प्रयत्न?
अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनाही निधी देऊन खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आमदारांमध्ये भरत गोगावले यांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनाही निधी देऊन खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आमदारांमध्ये भरत गोगावले यांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने गोगावले नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा निधी दिल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी देण्यात आलेला नाही. हे दोन्ही नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तरीही त्यांना निधी देण्यात आलेला नाही. मात्र, जयंत पाटील यांना निधी देण्यात आला आहे.