सुषमाताई, तुम्ही आता कुठे ठाकरेंना ओळखता?, हळूहळू खरे रंग समोर येतील, आम्ही मात्र…; शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य
शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच सुषमा अंधारे यांनाही सल्ला दिला आहे. पाहा...
मुंबई : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच सुषमा अंधारे यांनाही सल्ला दिला आहे. “सुषमा अंधारेएवढे दिवस कुठे होत्या?, त्या उद्धव ठाकरेंना किती ओळखतात. हळूहळू त्यांना उद्धव ठाकरे कळतील. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय”, असं गोगावले म्हणाले आहेत. “आदित्य ठाकरेंनी आम्हाला आवाहन देण्याचं काम केलंय. मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर देण्याचं काम ते करत आहेत. प्रत्येकजण आप आपल्या परीने काम करतो. नुसती गर्दी जमवून काही होतं नाही. पुण्याच्या निवडणुकीतून उत्तर मिळेल”, असं म्हणत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय.
Published on: Feb 27, 2023 07:57 AM