रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये वाद? शिंदेंचा आमदार म्हणतो, “आदिती तटकरे पालकमंत्री नकोच”

| Updated on: Jul 07, 2023 | 11:19 AM

अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी देखील महायुतीत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदिती तटकरे यांच्या प्रवेशानंतर त्यांना रायगडचे पालकमंत्री पद देणार असल्याची अशी चर्चा आहे. त्यामुळे रायगडमधील शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

रायगड: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकामध्ये सामी झाल्यानंतर शिंदे गटाची कोंडी झाली आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी देखील महायुतीत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदिती तटकरे यांच्या प्रवेशानंतर त्यांना रायगडचे पालकमंत्री पद देणार असल्याची अशी चर्चा आहे. त्यामुळे रायगडमधील शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यास रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या सर्व सहा आमदारांनी विरोध केला असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली. भरत गोगावले नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 07, 2023 11:19 AM
पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोले यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
“पुरोगामी जितेंद्र आव्हाड यांनी तेव्हा सही का केली?”, नरेश म्हस्के यांचा खोचक सवाल