समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा मोदींवर विश्वास : देवेंद्र फडणवीस
जे शक्य नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांनी आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. आपण सत्ते करता जन्माला आलेलो नाही. सत्ता आपल्याकरता एक साधन आहे
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या 43 वा वर्धापनानिमित्त मुंबईमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यक्रमास हजेरी लावली. जे शक्य नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांनी आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. आपण सत्ते करता जन्माला आलेलो नाही. सत्ता आपल्याकरता एक साधन आहे. ज्याचा उपयोग करून आपल्याला सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवायचा आहे. या लढाईतील एक उपकरण म्हणून आपल्याला सत्तेकडे बघितलं पाहिजे असे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष देशाच्या सगळ्या भागांमध्ये पोहचला आहे. नॉर्थ ईस्ट सारख्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार तयार झालेली आहेत. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा मोदीजी यांच्यावर विश्वास आहे. ते घर संसार परिवार सोडून 24 तास भारताचा विचार करतात. तर मोदीजींसारखं देव दुर्लभ असे नेतृत्व आपल्याला मिळाल्याचेही फडणवीस म्हणाले.