Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर प्रहार
शिवसेनेच्या मेळाव्यानंतर उत्तर सभा घेणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भास्कर जाधवांचा हल्लाबोल.
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हुंकार सभेनंतर दोन्ही बाजुने जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्यावर नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रतिक्रिय येणार नाही असे होणारच नाही. साहाजिकच राणेंनी पत्रकार परिषदेत गेत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लााबोल चढवला. मुख्यमंत्र्यांवर प्रहार करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेही आता चोख उत्तर दिलंय. शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar jadhav) केंद्रीय मंत्री नाराय़ण राणेंवर पलटवार केलाय. नारायण राणे म्हणजे कोकणी भाषेत सांगायचं झालं तर चव ना लव पण पाहूण्या पोटभर जेव, नारायण राणे यांचे कोकण आणि महाराष्ट्राने नाव विरसलंय. त्यामुळे माझी आठवण ठेवण्यासाठी नारायण राणे यांची धडपड सुरु असल्याचं सांगत भास्कर जाधवांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा समाचार घेतलाय.हिंदी भाषिकांसमोर मराठी भाषिकांचा आणि नेत्यांचा अवमान करणारी फडणवीस यांची सभा होती.देवेंद्र फडणवीस यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचली. भास्कर जाधवांचा फडणवीसांवर ही घणाघात