‘आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नैतिकतेचा पराभव’; शिवसेना नेत्याची खोचक टीका

| Updated on: Aug 03, 2023 | 9:25 AM

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. तर व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि टिळक परिवारातील लोक होते.

पुणे, 03 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा दोन दिवसांपुर्वी पार पडला. यावेळी पुण्यात अनेक पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. तर इतरही विकास उपक्रमांचे उद्धाटन करण्यात आलं. याचदरम्यान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. तर व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि टिळक परिवारातील लोक होते. त्यानंतर मात्र अजित पवार हे शरद पवार यांना टाळत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. यावेळी जाधव यांनी अजित पवार हे शरद पवार यांना का टाळत आहेत हे सांगताना, पवार यांचा पवार झाला नसून भाजप आणि मोदी यांच्या नैतिकतेचा तो पराभव झाल्याची घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या पक्षावर 70 हजार कोटींचा आरोप केला. त्याच पक्षाच्या प्रमुखाकडून पुरस्कार घेतल्याने पवार यांची चर्चा झाली. ज्यांनी घोटाळ्या आरोप केला तेच पुढे जाऊन शरद पवारांना भेटले. त्यामुळे हा पराभव मानायचा झाला तर मोदी यांचा आहे म्हणून अजित पवार पुढे येत नव्हते असा टोला लगावला आहे.

Published on: Aug 03, 2023 09:25 AM
‘संभाजी भिडे सारखी व्हायात माणसं भाजपने सोडली’; भास्कर जाधव यांची जहरी टीका
कार्यक्रमात हुल्लडबाजांनी हद्दच पार केली, गौतमी पाटील भडकली; म्हणाली, “…तर यापुढे येऊ नका”