‘जे. पी. नड्डा यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा’, ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, महाराष्ट्रातील चार भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जे. पी. नड्डा यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, महाराष्ट्रातील चार भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जे. पी. नड्डा यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.’ जे. पी. नड्डा यांची ऑडिओ क्लिप भाजपने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली पाहिजे. पारदर्शकता म्हणून हा आवाज जे.पी नड्डा यांचा आहे का? हे पाहिलं पाहिजे. जेणेकरून भाजपचा चेहरा अधिक स्पष्ट होईल, असे भास्कर जाधव म्हणाले.’आधीच्या भाजपकडे संस्कृती होती,नीतीमत्ता होती आणि आजची भाजपा सत्तापिपासू झाली आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याचा समाचार भास्कर जाधव यांनी घेतला आहे.’सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्या इतपत विधानसभा अध्यक्ष मोठे झाले असतील तर त्यांना मी धन्यवाद देतो’.