फायरब्रॅड नेत्या मनिषा कायंदेंचा शिवसेनेत प्रवेश; भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासून त्यांचा फोन नॉट रिचेबलही झाला आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील तीन नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनिषा कायंदे यांच्या या राजीनाम्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासून त्यांचा फोन नॉट रिचेबलही झाला आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील तीन नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनिषा कायंदे यांच्या या राजीनाम्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “40 आमदार, 13 खासदार गेले पण शिवसेना डगमगली नाही, त्यामुळे वर्धापनदिनानिमित्त एकच सांगेन शिवसेना ही वाढत जाणार आहे. भविष्यकाळ हा शिवसेनेचा आहे.”
Published on: Jun 18, 2023 01:29 PM