दादा भुसेंचा घोटाळा, राहुल कुल याचं मनिलाँड्रिंग; राऊत यांच फडणवीसांवर टीकास्त्र

| Updated on: Apr 26, 2023 | 12:12 PM

याप्रकरणी राज्य सरकार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही कारवाई करत नाही म्हणत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले.

मुंबई : दौंडचा भीमा पाटस साखर कारखाना, दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी राज्य सरकार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही कारवाई करत नाही म्हणत पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी आपण दौंडला जात असून तेथे कारखाना बचाव कृती समितीने सभा आयोजित केल्याचे सांगितले. तर भाजप आमदार राहुल कुल यांचा 500 कोटींचा घोटाळा उघड केला. जनता या घोटाळ्याने त्रस्त झाली आहे. मात्र फडणवीस यांच्या मनाला जरा ही वेदना होऊ नयेत असा सवाल केला आहे. उलट त्यांना विधीमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष केलं. शेतकऱ्यांचा हक्काचं काय? दादा भुसेंच्या गिरणा सहकारी साखर कारखान्यात 1800 कोटीच्या घोटाळा झाला. याप्रकरणी दहावेळा पत्रव्यवहार केला मात्र उत्तर द्यायचं सौजन्य त्यांच्याकडे नाही. राहुल कुल आणि दादा भुसे या दोघांवर आधी तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर आमच्या सगळ्यांवरचे आमचे कार्यकर्ते किंवा प्रमुख लोक आहेत यांच्यावर केलेले गुन्हेव मागे घ्यायलाच हवेत असे राऊत म्हणाले.

Published on: Apr 26, 2023 12:12 PM
राहुल कुल यांचे टेन्शन वाढणार! मतदारसंघात राऊतांची गर्जना, भीमा पाटसवरून काय बोलणार?
उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये तर…, संजय राऊत यांनी उद्योगमंत्र्यांना चांगलंच सुनावलं