BHIDE GURUJI : पुण्यात संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला भीमसैनिकांचा विरोध, २५ भीमसैनिक अटकेत
चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमसैनिक अश्विन वाघमारे यांनी केली आहे.
पुणे : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांच्या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे भीम सैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संभाजी भिडे यांचा पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला भीमसैनिकांनी विरोध दर्शविला. परंतु, दौंड पोलिसांनी 25 भीम सैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे समर्थकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमसैनिक अश्विन वाघमारे यांनी केली आहे.
Published on: Jan 20, 2023 09:46 AM