भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला

| Updated on: Nov 16, 2024 | 5:02 PM

मराठा आरक्षण आंदोलनाने लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या दिग्गज उमेदवारांना मराठवाड्यात चांगला फटका बसला होता. आता विधानसभेत मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर कोणाला पाडायचे ते पाडा आणि ज्यांना निवडून आणायचे ते आणा असे सांगितल्याचे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणूकांच्या वेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला विशेषत: भाजपाला मराठवाडा आणि विदर्भात बसला होता. या मुळे विधानसभा निवडणूकांत मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतू जरांगे यांनी उमेदवारांना उभे न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक पक्षांनी त्यांचे स्वागत केले आहे. परंतू मनोज जरांगे यांनी ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना आणा असे सांगत कार्यकर्त्यांवर निर्णय सोपवला आहे. आरक्षणाला जो – जो विरोध करेल त्याला पाडा असे आपण कार्यकर्त्यांना म्हटले आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आपण भुजबळांना टार्गेट केलेले नाही. उलट त्यांनी मराठा समाजाला सातत्याने टार्गेट केल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 16, 2024 05:01 PM
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले…
शिवरायांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन