अजितदादा गटातील आमदारांची मोठी घोषणा, ’25 आमदार राजीनामा देणार’, हे सांगितलं कारण
विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही योग्य तो निर्णय़ घेणार आहोत. विधानसभा अध्यक्ष हे कायद्याचे अभ्यासक आहेत. विधानसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय़ घेतीलच. तेव्हाचं तेव्हा पाहू आणि आता आमच्यासमोर फक्त समाज आहे. आम्ही पक्षप्रमुख यांच्याकडे राजीनामा देणार आहोत.
नाशिक : 12 ऑक्टोबर 2023 | अजितदादा गटातील आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठी भूमिका घेतली आहे. मला वर बसून मुद्दे मांडता येत नाही, म्हणून मी यांना मुद्दे मांडायला देतो. आता आपल्याला डोक्याने लढायचं आहे असेही ते म्हणालेत. आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मार्गदर्शन करताना मोठी घोषण केली. आदिवासीतून कुणाला आऱक्षण देता कामा नये. आम्हाला ४७ जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण, ४८ वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे. आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं तर कुठलचं सरकार राहणार नाही. सगळे आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला.