मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन अखेर स्थगित
मला काही लोकांच्या धमक्या येत आहेत. त्याचे रेकॉर्डिंग मी ठेवले आहे. ते पोलिसांना देणार. मीडियावर आलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून धमक्या देत आहेत. मात्र, मी धमक्यांना घाबरत नाही, समाजासाठी लढतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार
नागपूर : 29 सप्टेंबर 2023 | 20 दिवसांपासून आमचं आंदोलन सुरू होते त्याला यश आलं. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी आमच्या सगळ्या 22 मागण्या मान्य केल्या. सगळ्या मिटिंगचे मिनिट्स आणि रेकॉर्डिंग करण्यात आलं त्यामुळे आता शंका घेण्याचे कारण नाही. सगळ्या बाबी सकारात्मक झाल्याने आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली. यासोबतच राज्यातील इतर शहरातील आंदोलनसुद्धा स्थगित करत आहोत असे त्यांनी सांगितले. ही समाजाची लढाई आहे. बैठकीला 200 प्रतिनिधी होते. सगळ्याचे एकमत झाले त्यानुसारच हा निर्णय घेतला असेही ते म्हणाले.
Published on: Sep 30, 2023 07:57 PM