मोठी बातमी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहभागी प्रभाकरन जिवंत? कुणाचा हा खळबळजनक दावा ?

| Updated on: Feb 13, 2023 | 5:23 PM

२००९ मध्ये श्रीलंकन सैनिकांच्या कारवाईत प्रभाकरन याचा मृत्यू झाला होता. मात्र, तो जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

तामिळनाडू : लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलमचा ( LTTE ) चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे माजी मंत्री आणि तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना हा दावा केला आहे. प्रभाकरन जिवंत असून तो लवकरच सर्वांसमोर येईल असे ते म्हणाले आहेत. २००९ मध्ये श्रीलंकन सैनिकांच्या कारवाईत प्रभाकरन याचा मृत्यू झाला होता. मात्र, तो जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत प्रभाकरन सहभागी होता.

Published on: Feb 13, 2023 05:20 PM
जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेची भीती ? जयंत पाटील म्हणाले, १५ वर्षांपूर्वी काही गोष्टी…
सकाळचा शपथविधी बंड की गद्दारी? नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना सुनावलं