अयोध्येत होणाऱ्या भवनास शिवाजी महाराज भवन असं नावं द्यावं, साताऱ्यातून कोणी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यापत्रातून बिचुकले यांनी अयोध्येत होणाऱ्या महाराष्ट्र भवनाला छत्रपती शिवाजी महाराज भवन नावं द्यावं अशी मागणी केली आहे
सातारा : बिग बॉस या टीव्ही शोद्वारे घराघरात पोहोचलेले अभिजीत बिचुकले हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चांगलेच चर्चेत राहतात. याच्याआधी त्यांनी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याच्या शासनाच्या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून ते चर्चेत आळे होते. आताही पुन्हा बिचुकले यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यापत्रातून बिचुकले यांनी अयोध्येत होणाऱ्या महाराष्ट्र भवनाला छत्रपती शिवाजी महाराज भवन नावं द्यावं अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, आपला रिक्षावाला ते मुख्यमंत्री असा प्रवास आहे. तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मुख्यमंत्री आहात असे सुनावलं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतः आणि उद्धव ठाकरे गेले कित्येक दिवस ठाकरे शिंदे, शिंदे ठाकरे हा खेळ खेळत आहात अशीही टीका बिचुकले यांनी केली आहे.