शिंदेसाहेब साताऱ्याच्या सुनबाईला म्हणजेच माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा; अभिजित बिचुकले यांची मागणी
बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. ते पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करावं. जेने करून सर्व पक्ष लगेच सुटतील, असं बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा सोडवणार. आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय 2023 आणि विद्यार्थी म्हणतायत 2025 मात्र यामध्ये 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.
Published on: Feb 23, 2023 02:40 PM