जाहिरातीसाठी घेतली मोठी रक्कम, पण आता येणार अडचणीत, कोण आहेत हे दिग्गज कलाकार?
अभिनेता रणबीर कपूर याने जाहिरात केलेल्या महादेव गेमिंग अॅपचे संस्थापक आणखी 4 ते 5 अॅप चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. फक्त भारतातच नाही श्रीलंका, नेपाळ, यूएई येथे या अॅपचे कॉल सेंटर आहेत. या अॅपसाठी जाहिरात केलेल्या अन्य कलाकारांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई : 5 ऑक्टोबर 2023 | महादेव गेमिंग अॅप जाहिरात प्रकरणी अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावलं. रणबीर कपूर याला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे लक्ष लागले असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. महादेव बुक बेटिंग अॅपची अनेक कलाकार आणि गायक यांनी जाहिरात केली आहे. हे सर्व कलाकार ईडीच्या रडारवर आलेत. अभिनेता रणबीर कपूर याच्याप्रमाणेच अन्य कलाकार, गायक यांनीही या अॅपच्या जाहिरातीसाठी मोठी रक्कम घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली. कलाकार अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि इतर गायक यांनी महादेव अॅपची जाहिरात केल्याचे व्हिडिओ समोर आलेत.
Published on: Oct 05, 2023 04:50 PM