छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची…
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर रोहित पवार यांची सही असल्याचा दावा भुजबळ यांनी केला. तसेच, मुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिक : 22 सप्टेंबर 2023 | शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला. आमदाराला गरिबासाठी महत्वाचं असणारं काम करायचं असतं, तेव्हा मंत्र्यांकडे जावं लागतं. त्यावर सही करायची असेल तर प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. हे एक प्रकारे आमदारांना विकत घेण्यासारखं झालं असा आरोप त्यांनी केला होता. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं. रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं या पत्रावर सह्या केल्या आहेत असा गौप्यस्फोट त्यांनी केला. शरद पवार साहेब कायदेशीर लढाई लढणार नाही असे म्हणाले होते. पण, आता कायदेशीर नोटीसा देण्याचे काम सुरु झाले आहे. काय होते ते बघू असे भुजबळ म्हणाले. तर, मुख्यमंत्री बदलणार अशी फक्त चर्चा आहे. ५० लोक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. जागा खाली आहे का? असा टोला त्यांनी लगावला.