छगन भुजबळ यांचं मोठं विधान, बाळासाहेब समोर या, स्पष्टता आणा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. जे काही चाललं आहे. त्यामुळे ते परत येण्याची शक्यता नाही. म्हणून बाळासाहेब यांनी बोलले पाहिजे. खरी स्पष्टता समोर आणावी, असे आवाहन केलंय.
नाशिक : अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी चांगली लढत दिली. त्यांनी केलेलं काम आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा यामुळे त्यांना जास्त मते मिळाली. पण, डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांचाही जनसंपर्क चांगला होता. तीन वेळा डॉ. सुधीर तांबे आमदार होते. त्यांनी आपले मतदार निर्माण केले आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे विजयी झाले. पण, कॉंग्रेसमध्ये नेमके काय झाले ते कळले नाही. दोष कुणाचा आहे याचा अजून उलगडा झालेला नाही. मी इतके वर्ष राजकारण आहे. ए बी फॉर्म घेताना सगळे काही तपासले जाते. मात्र, सत्यजित तांबे यांना काँग्रेसवर सोडायची असेल तर असे आरोप होणारच. त्याला नाना पटोले उत्तर देतील. तांबे याचे आरोप पहाता ते कॉंग्रेस सोडतील. परत जाण्याचा त्यांचा हेतू दिसत नाही. पण, नेमके काय झाले ते काँग्रेसने पहावे. यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आता समोर आले पाहिजे. त्यांनी बोलले पाहिजे. खरी स्पष्टता समोर आणावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.