Bigg Boss 15 | सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे; बिग बॉमधून बाहेर पडल्यावर बिचुकलेचा संताप
सलमान खान (Salman Khan) स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिगबॉस(Bigg Boss 15)मधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचकुले(Abhijit Bichukale)नं व्यक्त केलाय.
सलमान खान (Salman Khan) स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिगबॉस(Bigg Boss 15)मधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचकुले(Abhijit Bichukale)नं व्यक्त केलाय. हिंदी बिग बॉसमध्ये काय चाललंय याचा खुलासा लवकरच करणार आहे. तिथं मला बोलावण्यात आलं होतं. मी गेलो नव्हतो, असंही त्यांनी म्हटलंय. अडीच महिने मी बिग बॉसच्या घरात होतो. तिथं काय झालं हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचं तो म्हणाला.