बिचुकलेंच मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मागणी
महिला वर्ग फक्त प्रवासच करत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करून घर सांभाळतात. सिलिंडरला 1200 रुपये द्यावे लागतात
सातारा : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे अनेकदा चर्चेत असतात. मध्यंतरिही ते कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून चर्चेत होते. तर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहल्याने ते चर्चेत आले आहेत. बिचुकले यांनी, अर्थसंकल्पात एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सवलतीच्या घोषणेवरून राज्य सरकारचे अभिनंदन केलं. तर सिलिंडरवरून शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
महिला वर्ग फक्त प्रवासच करत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करून घर सांभाळतात. सिलिंडरला 1200 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे खरी गरज आहे सिलिंडरच्या किंमती कमी करण्याची. सिलिंडरच्या किंमतीत पन्नास टक्के सवलत द्या, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे.