राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, याचिकेवर सुनावणी सुरु
ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेवरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती.
मुंबई: गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यात ठाकरे सरकार (Uddhav Thackrey) पडून शिंदे-फडणवीस (Cm Eknath Shinde) सरकार आलं यावेळी बरेच राजकीय नाट्य घडलं. मात्र हे राजकीय नाट्य राजकारणापुरते मर्यादित राहिलं नाही. तर हा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) पोहोचला. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेवरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवर गेली. आता आज शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे.