Video : गुजरात दंगल बिल्किस बानो बलात्कार प्रकरण! जन्मठेप सुनावलेल्या 11 दोषींची सुटका

| Updated on: Aug 16, 2022 | 6:52 AM

Bilkis Bano case : बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. बानो यांच्या कुटुंबातील सात लोकांना जीवे मारण्यात आलं होतं. तर पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्कीस बानो यांच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. 

गुजरात दंगलीतील बिल्किस बानो बलात्कार (Bilkis Bano case) प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. 3 मार्च 2002 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. 2022 साली घडलेलं हे बलात्कार (Rape Case) प्रकरण प्रचंड गाजलं होतं. संपूर्ण देश या बलात्कार प्रकरणानं हादरुन गेला होता. अखेर आता याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मुक्त करण्यात आलं आहे. बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. बानो यांच्या कुटुंबातील सात लोकांना जीवे मारण्यात आलं होतं. तर पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्कीस बानो यांच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता.

Published on: Aug 16, 2022 06:52 AM
Special Report | लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींकडून 5 संकल्पाची घोषणा
Atal Bihari Vajpayee: ‘गीत नया गाता हूँ…’ ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता…