Nana Patole: महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा भाजप व केंद्र सरकार प्रयत्न – नाना पटोले

| Updated on: May 03, 2022 | 4:22 PM

महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजप व प्रामुख्याने केंद्र सरकार कडून केला जात आहे. आताच नाही तर गेल्या दोन वर्षांपासून हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूर- कोणाबद्दल टीका करायची नाही या बद्दल जे काही नियम घालून दिले होते. त्या नियमांच्या (Rule)पलीकडे जे कोणी जाणार त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच होते. ते सगळे नियम तोडले गेलेत त्यामुळे आहे गुन्हे दाखल झाले आहेत. जो कोणे चुकीचे करेल त्याच्यावर प्रशासन कारवाई करेल. ते प्रशासनाचे काम आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजप व प्रामुख्याने केंद्र सरकार कडून केला जात आहे. आताच नाही तर गेल्या दोन वर्षांपासून हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Congress leader Nana Patole)यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचे नाव घेता त्यांच्यवरही टीका करत , त्यांच्यावर होत असलेली पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

Published on: May 03, 2022 04:19 PM
मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
Sambhaji Nagar मधील सभेत आदेश दिले होते, राज साहेब आज परत टि्वीट् करतील, किशोर शिंदेचं वक्तव्य- tv9