आधी तो निर्णय, मग मंत्रीमंडळ विस्तार, शिंदे गटाबाबत भाजपची सावध भूमिका
केंद्रामध्ये मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्यात येणार आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही.
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सातत्याने चर्चा सुरु असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्यात येणार आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपने सावध भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या चिन्ह, पक्ष याचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तर सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल आजपासून नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपने ही सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार न करण्याची सावध भूमिका घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
Published on: Feb 14, 2023 11:38 AM