शिवसेना नेत्याचं विधान आणि कोंडी भाजपची; अजित पवार यांच बुमरँग भाजपवरच उलटल
राज्यातही पवार कुटुंबियांवर असा दबाव टाकण्यात आल्यानेच अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाजप अजून चार मशिन आणि 'निरमा' पावडरची ऑर्डर देणार असे म्हटलं होतं
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप सत्तेचा गैर वापर करत आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी केला जात आहे. राज्यातही पवार कुटुंबियांवर असा दबाव टाकण्यात आल्यानेच अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाजप अजून चार मशिन आणि ‘निरमा’ पावडरची ऑर्डर देणार असे म्हटलं होतं. त्याचदरम्यान आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी देखिल आमच्याकडे गुजरातची ‘निरमा’ पावडर असल्यानेच अजित पवार भाजप प्रवेश करतायत असं म्हटलं. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. पहा त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 20, 2023 07:25 AM