संजय राठोड यांचे नाव घेत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचलं
अंधारे यांनी परभणी येथील सभेतून चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवत, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं म्हणून असं का असा प्रश्न उपस्थित केला
परभणी : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरती उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी स्वतच्या राजकारणासाठी एका पीडितेचा शिडीसारखा वापर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर संजय राठोड यांच्यावर निशाना साधताना त्यांच्या मांडीला मांडी लावून आता बसत आहात म्हणजे ते निर्दोश आहेत का असा सवाल ही उपस्थित केला आहे. अंधारे यांनी परभणी येथील सभेतून चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवत, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं म्हणून असं का असा प्रश्न उपस्थित केला. पण राऊत यांनी तिच्या माता-पित्यांनी विनंती केल्यानंतर तसं केलं. मात्र तुम्ही आक्रस्ताळेपणा करत ट्विट करत सुटला. पण पूजा चव्हाणची आई-वडील हे नाव घेऊ नका असं म्हणत असताना देखिल तुम्ही तिच्या नावाचा वापर केलात. त्यावेळी त्यावर आज कोण काहीच बोलत नाही. म्हणजे संजय राठोड निर्दोष आहेत.