Amol Mitkari On BJP | तिरंग्याच्या आडून भाजपचे व्यावसायिक धोरण, अमोल मिटकरी यांनी डागली तोफ
Amol Mitkari On BJP | राष्ट्रीय ध्वज तिरंग्याच्या आडून भाजपने व्यावसायिकता जपल्याची तोफ अमोल मिटकरी यांनी डागली
Amol Mitkari On BJP | भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोदी सरकारने (Modi Government) हर घर तिंरगा (National Flag on ever home) हा नवीन संकल्प सोडला आहे. त्यातंर्गत प्रत्येक घरावर तिरंगा (Tiranga) आवाहन करण्यात येत आहे. या धोरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी तोफ डागली आहे. भाजप तिरंग्याच्या आडून व्यावसायिक हित जोपासत (BJP commercial policy)असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोदी सरकार वारंवार राज्यघटनेचा अपमान करत आहे. अशोक चिन्हाचा त्यांनी अनादर केला आहे. आता तिरंग्याच्या नावावर धंदेबाजी सुरु असल्याचा घणाघात त्यांनी घातला. तिरंग्याच्या किंमतीवर सवाल उठवत कुठे 25 तर कुठे 30 रुपयांचा तिरंगा खरेदी करावा लागत असून यातून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. देशात मूलभूत प्रश्न तसेच असताना आझादी का पर्व कसा साजरा करता येऊ शकतो, असा सवाल ही त्यांनी विचारला. तसेच मोदी सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या धोरणांवर टीका केली.