अजित पवार यांच्या ‘स्टॅम्प पेपर’ या वक्तव्यावरून भाजपची मविआवर टीका? आता फक्त ‘गीता’
यामुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्यावर खोटक टीका केली. तसेच खोचक सल्ला देताना, किती रूपयांचा स्टॅम्प पेपर देता? असा सवाल केला.
मुंबई : विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या स्टॅम्प पेपरवर या वक्तव्यावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. यामुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्यावर खोटक टीका केली. तसेच खोचक सल्ला देताना, किती रूपयांचा स्टॅम्प पेपर देता? असा सवाल केला. तर आता स्टॅम्प पेपरवर काही चालत नाही. तुम्ही नोटरी करा असा सल्ला दिला. त्यानंतर आता यामुद्द्यावर भाजपने देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे. त्यांनी, अजित पवारांना त्याच्याच पक्षाचे बदनाम करत आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी अजित पवारांच्या राजकीय राजकारणावर, त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल प्रश्न निर्माण केले. ते आम्ही निर्माण केलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना वारंवार मी राष्ट्रवादीतच आहे, राहणार असं सांगवं लागतं. तर आता स्टॅम्प पेपरबद्दल बोलावं लागतं आहे. आता फक्त गीताच हातात घ्यायची राहिलेली आहे असा टोला लगावला आहे.