BJP executive meeting | BJP कार्यकारिणीची आज पनवेलमध्ये बैठक
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक आहे. पनवेल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीला भाजपचे आमदार खासदार त्याचबरोबर विविध विभागचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक आहे. पनवेल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीला भाजपचे आमदार खासदार त्याचबरोबर विविध विभागचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पहिली बैठक महाराष्ट्र प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची तर दुसरी बैठक प्रदेश कार्यसमितीची असणार आहे. या दोन्ही बैठकीला खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्रचे प्रभारी सिटी रवी त्याचबरोबर राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश देखील उपस्थित राहणार आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत तीन प्रस्ताव मांडले जाणार आहेत. पहिला प्रस्ताव राजकीय असणार आहे. या प्रस्ताव राजकीय परिस्थिती नवीन सरकारची वाटचाल या संदर्भातील असेल तर दुसरा प्रस्ताव शेती विषयक आणि तिसरा प्रस्ताव ओबीसीच राजकीय आरक्षण असणार आहे.
Published on: Jul 23, 2022 09:30 AM