फडणवीसांवर टीका करून ‘त्यांनी’ उरलीसुरली नीतिमत्ता घालवली; भाजप नेत्याची ठाकरेंवर टीका

| Updated on: Apr 05, 2023 | 7:17 AM

ठाकरे स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्री, पोलीस आयुक्त जेल मध्ये गेल्याचे म्हणत माणसाने सत्ता गेल्यानंतर इतकं वैफल्यग्रस्त होऊ नये असा सल्ला ही त्यांनी दिला आहे

नाशिक : भाजपच्या हुकुमशाहीविरोधात आम्ही वज्रमूठ बांधली आहे असा इशारा देत छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना आधी स्वतः आत्मपरीक्षण करावं असं म्हटलं आहे. तर ठाकरे स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्री, पोलीस आयुक्त जेल मध्ये गेल्याचे म्हणत माणसाने सत्ता गेल्यानंतर इतकं वैफल्यग्रस्त होऊ नये असा सल्ला ही त्यांनी दिला आहे. फडणवीस यांच्यावर टीका करून त्यांनी उरलीसुरली नीतिमत्ता घालवली आहे. त्यांना टीका फडणवीस यांच्यावर करण्याचा अधिकारच नाही असेही विखे पाटील म्हणाले.

Published on: Apr 05, 2023 07:17 AM
गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल अन्… , कुठं घडला प्रकार
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी पुण्यातील आक्रमक महिला नेतृत्व तयार; शिंदे-फडणवीस यांना घातली गळ