Gopichand Padalkar : माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
Gopichand Padalkar News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार रोहित पवार यांनीच माझ्यावर हल्ला घडवून आणला होता असं म्हणत आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 2021मध्ये सोलापुरात माझ्या गाडीवर जो हल्ला झाला तो रोहित पवार यांनी घडवून आणला होता. या घटनेचा फेरतपास करून त्यात रोहित पवार यांना आरोपी करायला हवं असंही पडळकर यांनी म्हंटलं आहे.
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांच्या समोर एका व्यक्तीला आणले. त्याच्या छातीवर शरद पवार यांचं चित्र गोंधलेलं आहे. या माणसाची ओळख करून देताना पडळकर म्हणाले की, हे शरद पवार यांचे चाहते महादेव देवकाते आहेत. ते मला एक वर्ष अधि पिंपरी चिंचवडमध्ये भेटले होते. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख नव्हती. त्यावेळी त्यांनी मला येऊन सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे तुमच्या विरोधात कट रचत आहेत. धनगर समाजाला पुढे करण्याचा यांचा प्लान आहे. म्हणजे लोकांना वाटेल की गोपीचंद पडळकरला धनगर समजाचाच विरोध आहे. त्यामुळे महादेव देवकाते यांचा जबाब घेऊन रोहित पवार यांना माझ्या हल्ला प्रकरणात आरोपी करावं अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, असंही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हंटलं.